मध्यवर्ती कारागृह येथील तोफ गाडयांना सह्याद्री प्रतिष्ठाने दिले नवीन रूप
सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांची कौतुकास्पद कामगिरी
मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचे काम करत असून गडाचे पावित्र्य बरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे,तोफ गाडे,स्वच्छता,जनजागृती करत असून या मोहिमे मध्ये हजारो दुर्गसेवक तन मन धन लावून काम करत आहेत.दुर्गसेवकांचे गडनावर तसेच तेथील वास्तुवर लक्ष ठेऊन तेथील वेळोवेळी गड किल्ल्याना नवसंजीवनी देण्याचे काम करत आहेत.ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेल्या तोफ गाडे यांना कलरनींग करण्या करिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधिक्षक राणी भोसले यांनी परवानगी दिली.
ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफ गाडे सुवेवस्थित राहण्या करिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीने 31 मे रोजी तोफ गाडयांना स्वच्छ व कळरिंग करून त्याचे पावसाच्या पाण्यापासून त्यांचे झिज होऊनये खराब होऊनयेत याकरिता शाकारनी करण्यात आली. सदर मोहिमेत तोफांना निळ्या,चंदेरी तैलीय रंगाने तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगाने रंगवन्यात आले.यावेळी दुर्गसेवक महेश विनरकर,संगीता जाधव,संजय सदजी,भावेश शार्दुल,साई जाधव दुर्गंसेवक यांच्या प्रयत्नाने तोफा व तोफगाडयांना नवसंजीवनी देण्यात आली. यावेळी ठाणे मध्यवर्ती कराग्रह उप अधीक्षक भवर यांनी दुर्गसेवकांचे कौतुक केले.गेली अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दुर्गसेवक गड किल्ल्याचे संवर्धन करत असून आमच्या कामातून वेळ काढून गडावरील तोफ, तोफगाडे, बुरुज, दरवाजे सुवेवस्तीत ठेवण्याचे काम करत असल्याचे पत्रकार अरुण ठाकरे यांच्या बरोबर सव्वाद साधताना म्हणाले.Add.....
बातम्या व जाहिरातीं साठी संपर्क साधा..!
NEWS INDIA
✒️अरुण ठाकरे [मुख्यसंपादक]
संपर्क: 7743897222/9224333831
Email ID: nyujindia@gmail.com
www.newsindia.in.net













Post a Comment
0 Comments