Type Here to Get Search Results !

NEWS INDIA

NEWS INDIA

वृद्धाश्रमातील ९० माय-बापांसोबत पत्रकार भगवान चंदे यांनी केला वाढदिवस

वृद्धाश्रमातील ९० माय-बापांसोबत पत्रकार चंदे यांनी केला वाढदिवस

                मुरबाड|शहापूर|ठाणे:[अरुण ठाकरे]

मुरबाड:महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबत आहे. संघटनेच्या ध्येय धोरणे यांची पुरेपूर अंमल बजावणी ठाणे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार भगवान चंदे करत असून संघटनेतील पत्रकार बांधवांच्या खंबीर पाठीशी उभे राहून त्यांचे सुख दुःख त्यांच्या अडचणी सोडविण्यात सतत पुढे असतात गेली अनेक वर्ष संघटनेचे काम करत असताना गोर गरीब, आदिवासी वाड्या पाड्या, विध्यार्थ्यांना मदतीचा हात सतत पुढे करत आपल्याला जमेल तसी मदत कार्यकरत असतात गेली अनेक वर्ष आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च दुर्गम भागातील शाळा, अनाथश्रम, मतिमंद मुलांची शाळा, आदिवासी वस्ती याठिकाणी खर्च करून त्यांच्या आनंदात चंदे आपला वाढदिवस साजरा करत सामाजिक बाधिलकी जपत आले आहेत.वयाची साठी उलटत असतानाही नेहमी प्रमाणे आपला वाढदिवस पत्रकारांना, कुटुंबाला सोबत घेऊन 1 जून साठवा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा केला.

             भगवान चंदे यांनी आपल्या कुटुंबा सोबत आपला साठवा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता भेटवस्तू नस्वीकारता अगदी साध्या पधद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेत वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी भिवंडी तालुक्यातील खडवली येथील ‘मातोश्री वृद्धाश्रम’ येथे वृद्धांसमवेत वाढदिवस साजरा केला. यावेळी चंदे यांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अल्पोपाहाराचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला यावेळी उपस्थित वृद्धांनी औक्षण करून, टाळ्यांच्या गजरात त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी वृद्ध आजी आजोबांनी भावना वेक्त करत “आज आम्हाला कुटुंबाची आठवण येत असल्याचे भावनिक मायेचे शब्द काढत चंदे यांच्या रूपाने मुलगा भेटल्यासारखे वाटले,” अशा भावना व्यक्त केल्या.

             वाढदिवसा प्रसंगी ९० माय-बापांसोबत काही क्षण घालवत आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच माझ्यासाठी खरे गिफ्ट आहे,” असे भगवान चंदे यांनी भावना वेक्त केल्या.आपला वाढदिवस एवढ्यावर न थांबवता दहागाव श्री स्वामी समर्थ मठात महाप्रसादा बरोबर हजारो गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.या उपक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा सहसचिव मिलिंद जाधव, भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे,पत्रकार कैलास ढमणे, पंढरीनाथ पाटील तसेच भारती चंदे, प्रतीक काठोळे, गणेश कराळे,पत्रकार संतोष गायकर,अरुण ठाकरे,अनंता घागस,संतोष चोणकर, पांडुरंग गायकवाड,प्रवीण काठोळे, प्रतिभा काठोळे,भगवान बोंद्रे,शांताराम भोईर,दीपक चंदे,दीप्ती चंदे,अभिषेक चंदे,नलिनी वेखंडे, सुभाष सातपुते, पारू सातपुते यांच्यासह वृद्धाश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार भगवान चंदे, कैलास ढमणे व लकीचंद पाटील यांनी वृद्धाश्रमाला आर्थिक मदत देत आधार दिला.भगवान चंदे यांनी वाढदिवसाचे अवंचित्त साधतं व्रध मायबापच्या चेहऱ्यावरचे आनंद त्यांना दिलेला आधार या कौतुकास्पनंद उपक्रमाणे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Add......














बातम्या व जाहिरातीं साठी संपर्क साधा..!

NEWS INDIA

✒️अरुण ठाकरे [मुख्यसंपादक]

संपर्क: 7743897222/9224333831

Email ID: nyujindia@gmail.com

www.newsindia.in.net



Post a Comment

0 Comments