TATA AIG मेडिक्लेम उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने अरुण ठाकरे यांचा गौरव
मुरबाड|ठाणे:[अरुण ठाकरे] मुरबाड तालुक्यात धडाडीची पत्रकारिता आणि आरोग्य विमा क्षेत्रात आपल्या कार्याचा अनमोल ठसा उमटविणारे अरुण चंद्रकांत ठाकरे यांना टाटा AIG हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या वतीने उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. कल्याण शाखेअंतर्गत कार्यरत तब्बल ११०० आरोग्य विमा प्रतिनिधींमधून केवळ ३० प्रतिनिधी या सन्मानासाठी पात्र ठरले असून त्यामध्ये मुरबाडच्या अरुण ठाकरे यांचा समावेश झाल्याने मुरबाड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ आरोग्य विमा क्षेत्रात विश्वासार्ह सेवा देणारी टाटा AIG कंपनी ग्राहकांना दर्जेदार सेवा, जलद क्लेम सेटलमेंट आणि कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तब्बल ९८ टक्के असून शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत आरोग्य विम्याचे मजबूत जाळे उभे करण्यात कंपनी अग्रस्थानी आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय व्यवसाय करून अरुण ठाकरे यांनी टाटा AIG च्या वार्षिक क्लब मेंबरशिपसह प्रतिष्ठित IPL कॉन्टेस्टसाठी पात्रता मिळवली. त्यांच्या या यशाची दखल घेत कल्याण शाखेत आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात एरिया सेल्स मॅनेजर जया बौराशी, एरिया सेल्स मॅनेजर तुषार चौधरी आणि चॅनेल सेल्स मॅनेजर रियाज मुजावर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. अरुण ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मुरबाड शहरासह दुर्गम ग्रामीण भागात जाऊन नागरिकांना आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून दिले आहे. हजारो कुटुंबांपर्यंत विमा संरक्षण पोहोचवत त्यांनी अनेकांना वैद्यकीय खर्चाच्या आर्थिक संकटातून दिलासा मिळवून दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक नागरिकांनी आरोग्य विमा स्वीकारून स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित केले आहे. विशेष म्हणजे मुरबाड शहरातील नागरिकांना कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून चॅनेल सेल्स मॅनेजर रियाज मुजावर यांच्या सहकार्याने शहरातील मोरया हॉस्पिटलमध्ये टाटा AIG ची कॅशलेस सुविधा सुरू करण्यात यश आले. याशिवाय इतर रुग्णालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी जपत विमा क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अरुण ठाकरे यांच्या या यशाबद्दल मुरबाड तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Add......











Post a Comment
0 Comments