मुरबाड शहरातील पथविक्रेत्यांच्या समस्या सोडवून न्याय देणार - पत्रकार पवार
मुरबाड नगरपंचायत पथविक्रेता समितीवर पत्रकार दिलीप पवार यांची निवड
मुरबाड | ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या अंतर्गत मुरबाड नगरपंचायतीच्या पथविक्रेता समितीवर अशासकीय संघटना प्रतिनिधी सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते दिलीप अनंत पवार यांची निवड करण्यात आली आहे.गेले दहा वर्ष आपल्या सडेतोड व अभ्यासपुर्ण लेखनिच्या माध्यमातून अनेक विषयांना ते वाचा फोडत आहेत.
मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील निकृष्ट, बोगस कामांचा विषय, फुटपाथ वरिल झालेले अतिक्रमण, मुख्य बाजारपेठेतील वाहन पार्किंग, वाहतूक कोंडीचा विषय असो,शहरातील पाणी प्रश्न,शहरातील अस्वच्छता, रस्ते, गटारे, स्वच्छता गृहे,असे नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या व महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.याच बरोबर विविध सामाजिक आंदोलनामध्ये त्यांची महत्वपूर्ण भुमिका असते.या पुढे ते आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीच्या माध्यमातून, प्रशासकीय अभ्यासातून निश्चितच मुरबाड शहरातील पथविक्रेत्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याची भुमिका बजावतील अशी चर्चा शहरातील सुज्ञ नागरिक करत आहेत. दिलीप पवार यांच्या सारखा अभ्यासू ,शांत व प्रशासकीय ज्ञानाचा वापर नक्कीच करतील यात शंका नाही. त्यांच्या या निवडी बद्दल मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, तहसीलदार अभिजित देशमुख, मुख्याधिकारी मनोज म्हसे, मा.नगराध्यक्ष मोहन सासे, समाजसेवक मेहबूबभाई पैठणकर यांनी अभिनंदन केले असून मुरबाड शहर व तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रामधून त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.
Add......
बातम्या व जाहिरातीं साठी संपर्क साधा..!
NEWS INDIA
✒️अरुण ठाकरे [ मुख्यसंपादक ]
☎️ 7743897222
Email ID: nyujindia@gmail.com
www.newsindia.in.net







Post a Comment
0 Comments