शासनाच्या तिजोरीवर दरोडा, भ्रष्टाचाराणे वनखाते बरबटले
ठाणे जिल्ह्यातील वन विभागाचा गौडबंगाल - पत्रकार हरेश हरड
मुरबाड|ठाणे:अरुण ठाकरे
मुरबाड: वाढते तापमान आणि वणधिकाऱ्यांच्या संघणमताने होणारी वृक्ष तोड मानवी जीवनासाठी हानिकारक ठरत असून अनेक तक्रारी करूनही कारवाही होत नसाल्याने जगलं ठेकेदारही चांगलेच माजले असून नेहमीच आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या ठाणे जिल्ह्यातील वन विभागाचा आणखी एक मोठा गौडबंगाल लवकरच चव्हाट्यावर येण्याची चिन्हे दिसत असून, या प्रकरणी ठाणे जिल्ह्याचे धाडसी भूमिपुत्र तथा युवा वृत्त संपादक हरेश हरड यांनी संपूर्ण वन विभागाची पोलखोल करण्यासाठी थेट रणशिंग फुंकले आहे.
शासनाच्या तिजोरीवर दरोडा, राखीव वनांत दारूचा महापूर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून जनतेच्या पैशाची लूट, यासंदर्भात सुस्त प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी पत्रकार हरेश हरड यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून परिणामी, शहापूर-ठाणे पट्ट्यातील वनसंपदा रक्षणकर्त्यांनीच भक्षण करायला सुरुवात केली आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होतांना दिसत आहे.
डोळखांब वनपरिक्षेत्रात 'डबल फंडिंग'चा महाघोटाळा झाल्याच्या चौकशीची मागणी हरेश हरड यांनी केली होती. तत्कालीन वनपाल जयवंत फर्डे यांनी एकाच कामासाठी चक्क दोन वेगवेगळ्या विभागांकडून निधी उकळला असल्याचे त्यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केले असताना, वरिष्ठ अधिकारी चौकशीला गेल्यावर त्यांना तिथे कामच सापडले नसल्याचे आश्चर्य व्यक केला जात आहे. त्यामुळे यामागील आर्थिक धागेदोरे आता उघड असल्याचे मत हरड यांनी व्यक्त केले आहे. तरीही ही चौकशी कमिटी 'अर्थपूर्ण' शांत का आहे? फर्डेंना कोणाचे राजकीय अभय आहे? असे अनेक मुद्दे घेऊन उपोषनास बसले असता यावेळी अनेक सामाजिक राजकीय संघटनानी पाठींबा दिला.हरेश हरड यांनी लोकशाही मार्गानेदि.२८ एप्रिल पासून रोजी ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे "अन्न-त्याग" आमरण उपोषण अखेर वनवृत्त स्थरावर मागणी नुसार नमूद मुद्यांवर समिती नेमून 15 दिवसात उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्र दीपेश मल्होत्रा उपवनसंरक्षक अधिकारी शहापूर वनविभाग शहापूर यांनी दिल्यानंतर तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले असून या भ्रष्ट अधिकाऱ्यांन वर काय कारवाही होते कि पाठीशी घातले जाणार याकडे नगरिकांचे लक्ष लागले आहे.बातम्या व जाहिरातीं साठी संपर्क साधा....!
*अरुण ठाकरे [ मुख्यसंपादक ]*
📹 NEWS INDIA 📹
☎️ *7743897222*
Email ID: nyujindia@gmail.com
www.newsindia.in.net




Post a Comment
0 Comments