महिलांनी भास्कराव पेरेपाटील यांचा आदर्श घेतला तर गावाचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही.
शेकडो महिलांनी घेतला पतप्रधान मोफत उज्वला गॅस लाभ
मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: पतप्रधान मोफत उज्वला गॅस कॅम्प श्री खंबालिंगेश्वर मंदिर हॉल येथे भालचंद्र कुर्ले तसेच ग्रामस्थ मंडळ आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचत नसल्याने भालचंद्र कुर्ले सर यांनी पुढाकार घेऊन मोफत उज्वला गॅस सर्व महिलांना लाभ मिळावा तसेच महिलानां धावाधाव करावा लागू नये या उद्देशाने म्हसा खांबलिंगेश्वर मंदिर हॉल येथे ओम नाम:शिवाय इंण्डेन ग्रामीण वितरक नारिवली अंतर्गत कॅम्प चे आयोजन करून महिलांना पतप्रधान मोफत उज्वला गॅस संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाचे अवंचित्त साधतं भालचंद्र कुर्ले सर यांनी शेकडो महिलांना पंतप्रधान योजनेतुन मोफत उज्वला गॅस चे वितरण करत शेकडो संसाराच्या ज्योती प्रज्वलित करून महामानवाला एक आगळीवेगळी मानवंदना दिली.यावेळी म्हसा ग्रामपंचायत च्या सरपंच जया घागस,कान्होळच्या सरपंच रेश्मा घरत,परशुराम भोईर,कचरु म्हारसे,जीवन कुर्ले,काळुराम शिंदे माजी ग्रा. प.सदस्य,गजानन घागस ग्रा. प.सदस्य,ह.भ.प.मंगल महाराज गायकर,ASI निवृत्त पोलीस बंदू भोईर यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.पतप्रधान मोफत उज्वला गॅस महिलांन करिता योजना असून या योजने अंतर्गत तीन मोफत ग्यास मिळणार असल्याने या योजनेचा लाभ तळागाळातील महिलांना मिळण्या करिता सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा तसेच पारनेर चे आदर्श सरपंच भास्करराव पेरेपाटील यांनी जो आपल्या गावाचा विकास शासनाच्या योजनाचा पुरेपूर फायदा घेत गावाला हायटेक गाव बनवून ठवले आहे याच धर्तीवर जर महिलांनी भास्कराव पेरेपाटील यांचा आदर्श घेऊन दृढ निच्चय केला तर गावाचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही. असा विश्वास भालचंद्र कुर्ले सर यांनी वेक्त केला यावेळी गावातील कर्तव्य दक्ष महिला महाराष्ट्र शासनाची कोणतीही योजना असो गावातील प्रत्येक महिलांन पर्यंत पोहचवण्याचं काम वासंती हाजारे करत असल्याने त्यांचे विशेष कौतुक केले.
जाहिराती करिता संपर्क:
जाहिराती करिता संपर्क:


















Post a Comment
0 Comments