मुरबाड शहर व ग्रामीण भाग 100 केव्ही पडघा - मुरबाड 2 या एकाच विदयुत वाहिनी द्वारे वीज पुरवठा,राष्ट्रीय महामार्ग क्रं.61 विदयुत वाहिनी मनोऱ्याचे काम सुरु
मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रं.61 चे काम चालू असून या महार्गा वर लाईट चे हाय पॉवरचे टॉवर असून काम मध्ये अडथळा ठरत असल्याने तसेच रस्त्याच्या मधोमध येत असल्याने हॆ टॉवर मुख्य रस्त्या पासून बाजूला करण्याचे काम रविवार दि.14 ते 16 दरम्यान होणार असल्याने यावेळी विदयुत पुरवठा खंडित होणार आहे.
कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रं.61 च्या नूतनी करणार करिता अ.व.डा.संवसु डोंबिवली विभागातील दि.14/09/2025 पासून 16/09/2025 या दरम्यान 100 केव्ही पडघा - मुरबाड वाहिनी वर काम करण्यात येणार असल्याने वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याने संबंधित ग्राकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांनी केले आहे.विदयुत वाहिनी टॉवरच्या कामा वेळी 100 केव्ही पडघा मुरबाड विदयुत वाहिनी मनोऱ्याचे काम मुरबाड शहर व ग्रामीण भाग 100 केव्ही पडघा - मुरबाड 2 या एकाच विदयुत वाहिनी द्वारे वीज पुरवठा करण्यात येणार असून कामा दरम्यान सदर विदयुत वाहिनी मध्ये काही बिघाड झाल्यास या परिसरा मध्ये काही काळा करिता विदयुत पुरवठा खंडित होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांनी केले आहे.
जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments