शिक्षक दिनानिमित्त आयोजित नॅशनल आयकॉन अवार्ड २०२५ कार्यक्रम मलकापूर भातॄ मंडळ येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तॄत्वमान व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्यात आला. हिंदी मराठी पत्रकार संघाचा च्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल आयकॉन अवार्ड २०२५ चे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव आँनलाईन मागविण्यात आले होते. त्यावेळी ८५५ प्रस्ताव पैकी निवड करुन १५० मान्यवरांना नॅशनल आयकॉन अवार्ड २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच ११० शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्यांना अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
नॅशनल आयकॉन अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रा.अनिल खर्चै (प्राचार्य व्ही.बी.कोलते इंजिनीअरिंग कॉलेज) तर प्रमुख पाहुणे भाई अशांत वानखेडे (संस्थापक समतेचे निळे वादळ), धनश्रीताई काटीकर पाटील (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ), बाळासाहेब दामोदर उद्योजक, ऍड सम्यक चवरे, दामोदर शर्मा शेतकरी नेते, विजयकुमार डागा, दिलीप आढाव (प्राचार्य विद्या विकास विद्यालय), सरिता पाटील (प्राचार्य प्राथमिक मराठी आमची शाळा ), विद्या काळबांडे (प्राचार्य चांडक विद्यालय), डॉ.प्रदीप गायकी वाहतूक नियंत्रण नांदुरा, हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.आणि पुरस्कार देण्यात सुरुवात करण्यात आली वाशिम जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील श्री माणिकराव गंगावणे गुरूजी मंगरुळपीर व कॄषी क्षेत्रातील श्री शिवदास महादेवराव ताठे पाटील कारंजा (लाड) व पत्रकारिता क्षेत्रातील श्री संजय भरदुक मंगरुळपीर (वाशिम) आणि कला क्षेत्रातील प्रशांत वसंतराव क्हे मंगरुळपीर यांना वरील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र,मेडल, देऊन गौरव करून सन्मानित करून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Post a Comment
0 Comments