कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई,शाखा शहापूर वार्षिक सर्वसाधारण सभे वेळी गुणगौरव व वर्षा सहलीचा सभासद वा नागरिकांनी घेतला आनंद
मुरबाड|शहापूर|ठाणे: [अरुण ठाकरे]
शहापूर: कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका शहापूरची सन २०२४- २५ या वर्षाची सर्वसाधारण सभा जांभे धरणाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडली.वैचारिक व प्रबोधनात्मक वारसा घेऊन कार्यरत असलेल्या शहापूर शाखेची या वर्षी प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासदांच्या परिवारातील पाल्यांचा गुणगौरव व वर्षा सहल असा तिहेरी एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी उमेश पाटील यांनी मागील वर्षीचा कार्य अहवाल सादर केला तर खजिनदार नामदेव तिवरे यांनी जमा - खर्चाचा अहवाल उपस्थित सभासदांसमोर सादर केला.
शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाल्यांचा सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शाखेच्या कामकाजासाठी बहुमोल योगदान देणारे खजिनदार नामदेव तिवरे यांचा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाखेच्या उपक्रमांना नेहमीच प्रसिद्धी देणारे पत्रकार निलेश विशे, बाळाराम गोळे व कांतिलाल वरकुटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमा प्रसंगी लहान मुले व महिला विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सदस्यांनी जांभे धरणाच्या प्रवाहात उतरुन पाण्यामध्ये मनमुराद वर्षा सहलीचा आनंद लुटला.कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका शहापूर सतत विध्यार्थी, तसेच समाज हिता करिता अनेक उपक्रम रबावत असून आपल्या समाजाला येणाऱ्या अडिअडचणी सोडविण्यात पुढे असून एक कर्तव्य निष्ठ काम करणारी समाजाचे हित जोपसणारी संघटना म्हणून नावाला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई,शाखा तालुका शहापूर पुढे येत असल्याने शहापूर कुणबी समाज ही त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहे.वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन प्रसाद फर्डे यांनी केले तर शाखेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, 'कुणबी समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांड यात गुंतून न पडता आपल्या संविधानिक हक्क व अधिकाराविषयी जागरूक राहून समाजाला नवी दिशा दिली पाहिजे' असे प्रतिपादन केले. सभेच्या आयोजनासाठी जांभे ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य सभा संपन्न झाली.
जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments