Type Here to Get Search Results !

NEWS INDIA

NEWS INDIA

मुरबाड करांचे रेल्वेचे स्वप्न अजूनही स्वप्नच,तेच स्वप्न डेहनोली येथील तरुणाने मुरबाड रेल्वे देखव्यातून सकारून वेधले लक्ष


मुरबाड करांचे रेल्वेचे स्वप्न अजूनही स्वप्नच,तेच स्वप्न डेहनोली येथील तरुणाने मुरबाड रेल्वे देखव्यातून सकारून वेधले लक्ष 


नारिवळीत दिगंबर विशे यांनी साकारला सप्तश्रुंगी देवीचा हुबेहूब गड,गणेशाचे दर्शन करताना साक्षात सप्तश्रुंगी गडावर गेल्याचा होतो भास 


            मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]

            मुरबाड: मुरबाडात गणेश उत्सव अगदी आनंदात साजरा होत असतांना शहरी भागा सह ग्रामीण भागण मध्ये गणपती सना निमित्त विविध देखावे तयार करण्यात आले आहेत यामध्ये डेहनोली येथील येथील केंबारी कुंटुबाने घरच्या गणपती बाप्पाच्या देखाव्यातून मुरबाड रेल्वेची व्यथा मांडून संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

नारिवली येथील विशे कुंटुबातील घरच्या गणपती बाप्पाच्या देखाव्यातून दिगंबर विशे याने सप्तश्रुंगी देवीचा हुबेहूब गड,मंदिर, पायरी मार्ग, रोपवे सकारून सप्तश्रुंगी देवीचे दर्शन घडवले असून देखावा पाहण्यास व गणपाती बाप्पाच्या दर्शना सोबत सप्तश्रुंगी देवीचा दर्शन घडत असल्याने गणेश भक्तांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून डेकोरेशन पाहण्या करिता तालुक्यातील गणेश भक्तत येत आहेत.
              गेली अनेक वर्ष रेल्वेचे स्वप्न मुरबाड कर बाळगून आहेत मात्र मुरबाड कराणंच्या वाट्याला रेल्वेचे गाजर आणि फसवणूकीची आस्वासने आली असून गणपती सना निमित्त मुरबाड करांनी उराशी बाळगून असलेले रेल्वेचे स्वप्न मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावातील कु.ऋतिक रघुनाथ केंबारी या तरुणाने रात्रीचे दिवस करून गणपती बाप्पाच्या देखाव्यातून मुरबाड रेल्वेचा देखावा साकारला आहे.मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांची जन्मभूमी असणाऱ्या मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न सत्यात कधी उतरेल ते माहित नाही,मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला रेल्वे मिळावी यासाठी देश स्वातंत्र्य झाल्या पासून मागणी होत आहे परंतु राजकीय इच्छा शक्ती नसल्याने व तांत्रिक कारणे पुढे करित मुरबाड करांचे रेल्वेचे स्वप्न अजूनही स्वप्नच राहिले आहे.



Add.....

जाहिराती करिता संपर्क: 

न्यूज इंडिया  मुख्य संपादक अरुण ठाकरे Mob.No.7743897222
Email Id : indiyanyuj@gmail.com
www.newsindia.in.net











Add.....

जाहिराती करिता संपर्क: 

न्यूज इंडिया  मुख्य संपादक अरुण ठाकरे Mob.No.7743897222
Email Id : indiyanyuj@gmail.com
www.newsindia.in.net


Post a Comment

0 Comments