आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नवीन पाच बसाचे लोकार्पण,कल्याण मुरबाड प्रवास होणार आरामदाई तर ग्रामीण भागातील प्रवाश्यांच्या वाट्याला भंगार बसचा प्रवास
मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: गौरी-गणपती सणानिमित्त आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पाच नवीन बसांचे लोकार्पनं करण्यात आले.मुरबाड आगारात अनेक बसांची दुर्वास्था झाली असून गेली वर्षनं वर्ष नवीन बसची वारंवार लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांन कडुन मागणी होत होती याच पार्शव भूमीवर आमदार कथोरे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मुरबाड एस टी आगारात दहा बस दाखल झाल्या आहेत त्या पैकी पाच बसाचे लोकार्पण आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुरबाड आगारात काही बस CNG वर असून मुरबाड मध्ये cng भरण्याची वेवस्था नसल्याने मुरबाड ते कल्याण ठिकाणी जाणाऱ्या बस cng भरण्या करिता बाहेर जावे लागत असल्याने प्रवाश्याना तासंतास ताटकळत रहावे लागत आहे. तर अनेक बसेस बेभरवंश्यावर चालवल्या जात असून प्रवाश्याना याचा त्रास सहन करावा लागत असून या बस मधून ग्रामीण भागातील सर्वसामण्य नागरिक प्रवास करतात तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी अजून किती दिवस या भंगार बस मधून प्रवास करावा लागनार याची नागरिकांत चर्चा होत असून गौरी-गणपती सणानिमित्त आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पाच नवीन बसांचे लोकार्पनं केले असून सध्या मुरबाड डेपो मध्ये दहा नवीन बस आल्या असून अजून दहा बस ची मागणी करणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले तर मुरबाड बस आगारात दहा नवीन बस पैकी सध्या गणपती निमित्ताने पाच बस कोकणात पाठवण्यात आल्या असून तीन बस कल्याण व दोन बस शहापूर येथे पाठवण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख मुसळे यांनी सांगितले.तर ग्रामीण भागात रस्ते खराब तसेच झाडे असून काचा फुटण्याच्या तसेच गाड्या खराब होऊ शकता म्हणून सध्या या बस कल्याण, शहापूर चालवण्यात येणार असल्याचे डेपो म्यानेजर मुसळे म्हणाले ग्रामीण भागातील प्रवाश्याची अवस्था जैसेथे राहण्याचे संकेत दिसत असल्याने अजून किती दिवस ग्रामीण भागातील नागरिकांना या भंगार बसमधून प्रवसा करावा लागणार आहे.मुरबाड आगारत नवीन दहा बस दाखल झाल्याने तीन बस कल्याण तर दोन बस शहापूर धावणार असल्याने सध्या स्थितील मुरबाड कल्याण व मुरबाड शहापूर येथे प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना दिलासा मिळाला असून अजून प्रवाश्यानं मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments