विदयुत महामंडळाच्या अनागोंदी कारभारला कंटाळून संतप्त नागरिकांचा धसई विदयुत कार्यालयावर मोर्चा
मुरबाड|ठाणे:[अरुण ठाकरे]
मुरबाड: विदयुत महामंडळाच्या अनागोंदी व मनमानी कारभारा विरोधात विदयुत कार्यालय सरळगांव,धसई, टोकावडे व शिरोशी परिसर येथील नागरीकांच्या वतीने धसई विदयुत कार्यालयावर जाहीर मोर्चा धडकणार असून परिसरातील नागरिकांना विज पुरवठा होत नसल्याने अनेक समस्याने सामोरे जावे लागत असून वेळोवेळी विदयुत विभागाला कळऊनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांन वर आणदोलन करण्याची वेळ आली असून पंचक्रोशीतील संतप्त नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष अप्पा घरत यांच्या मार्गदर्शना खाली विजय सुरोशे,विशाल सुभाष घरत,पंढरीनाथ घावट,श्याम भोंडीवले,विकास मोहप,जयवंत भला तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग,नागरीक,व्यापारी वर्ग,छोठे मोठे धंदेवाले,पालक वर्ग धसई येथे विदयुत महामंडळ धडकणार आहेत.
गेली वर्षाभरात विदयुत विज कंपनीच्या मनमानी
व अनागोंदी कारभाराबाबत वारंवार तक्रारी अर्ज, विनंत्या व प्रत्यक्ष भेटून विज कंपनीचा कारभार सुधारण्यास
सुचविले होते. तरी सुध्दा त्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नसून त्या उलट विदयुत कंपनीचा कारभार
जास्त बिघडला आहे. त्यामुळे या विदयुत कंपनीच्या विरुध्द जनता त्रस्त झाली आहे.प्रामुख्याने कोणत्याही वेळी विज पुरवठा खंडीत करणे,अवाजवी बिले देणे,चुकीची बिले देणे व केव्हाही रात्री बे रात्री सतत लाईट जाणे, कमी दाबाचा विदयुत पुरवठा करणे, सडलेले लोखंडी पोळ व तारा न बदलणे, विदयुत बंदच्या नावाखाली पुर्ण दिवस विदयुत पुरवठा बंद करणे, सतत विदयुत पुरवठा बंद असल्यामुळे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. अशा या रामभरोसे विदयुत कंपनीमुळे शाळकरी मुलांचे, शेतकऱ्यांचे, व्यापारी वर्गाचे खुप नुकसान होत आहे.तसेच प्रशासन सरकारला जाणून-बुजुन बदनाम करीत आहे. अशा या अनेक कारणामुळे विदयुत विजपुरवठाकं पनीचा कारभार सुधारण्यासाठी कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात मुरबाड तालुक्यातील सरळगांव,धसई,टोकावडे, शिरोशी या विभागातील नागरीकांच्या वतीने धसई कार्यालयावर दि.१८/८/२०२५ रोजी जाहीर निषेध मोर्च्या धडकणार असून नागरिकांना आपल्या समस्या सोडविन्या करिता मोर्च्या काढण्याची दुर्दैवी वेळ आली असून विदयुत महामंडळावर आमदार,खाजदार, लोकप्रतिनिधीनच वचक राहिला आहे कि नाही अशी चर्चा नागरिकांत होत आहे.
जाहिराती करिता संपर्क:
जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments