चिमुकल्याणी लेझिम प्रात्यक्षिक सादर करून झेड्याला दिली सलामी
जि.प.शाळा,ग्रामपंचायती,कॉलेज येथे झेंडा फडकविण्याचा मान दहावी बारावी प्रथम येणाऱ्या विद्यार्त्यांना व सैनिकांना मिळत असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण
मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: 79 वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण मुरबाड तालुक्यात आनंदात साजरा झाला यावेळी मुरबाड पोलीस स्टेशनं,पंचायत संमती,नगरपंचायत,शाळा,कॉलेज तसेच मुरबाड तहसीलदार कार्यालय येथे मोठ्या थाटामाटात 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी तहसीलदार अभिजित देशमुख,मुरबाड पोलिसस्टेशनंचे वरिष्ठपोलीस निरीक्षक संदिप गिते,निवासी नायब तहसीलदार सुषमा बांगर(आव्हाड),नायब तहसीलदार अमोल शिंदे,नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे,सार्वजनिक बांधकाम विभाग वरिष्ठअभियंता संजय कोरडे उपस्तित होते. मुरबाड तहसील कार्यालया अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक दगडूलाल शहा,पंढरीनाथ पिसाट,चंदूकाका देहरकर यांचे नातलग विजय शहा,संतोष पिसाट,हेरंब देहरकर यांचा सन्मान करून तहसीलदार अभिजित देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
तालुक्यातील विविध भागात 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारिवली चिमुकल्याणी लेझिम प्रात्यक्षिक सादर करून झेड्याला सलामी दिली यावेळी या चिमुकळ्याच्या प्रत्यक्षिकाणे उपस्तित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. भादाणे झेंडावंदन उपक्रमाचे संकल्पक संजय हांडोरे पाटील यांच्या निर्णयाचे अनुकरण अनेक ग्रामपंचायती, शाळा याठिकाणी राबवीला जात असून याच धर्तीवर ग्रामपंचायत भूवन या ग्रामपंचायतीने दोन वर्षापूर्वीच ग्रामसभेत ठराव घेऊन व शाळा व्यवस्थापन समितीला शिफारस करुन ध्वज फडकविण्याचा सन्मान दहावीत प्रथम क्रमांक आलेल्या प्रथमेश यशवंत भोईर या विद्यार्थ्याला शाळेचा ध्वज फडकविण्याचा मान मिळाला. नारिवली ग्रामपंचायत कार्यलय येथे इयत्ता दहावी मध्ये प्रथम भार्गवी उमेश बांगर विद्यार्थ्यांनी हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद मुलींची शाळा नं2 मुरबाड येथे नगरसेवक रवींद्र देसले यांच्या हस्ते करण्यात आले.जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments