विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून मा.आमदार गोटिराम पवार यांचा वाढदिवस साजरा
मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड व्हाईट हाऊस शिवळे येथे लोकनेते माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ९जुलै २०२५रोजी सुभाष पवार जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न झाला यावेळी उच्च शैक्षणिक तसेच इयत्ता उत्तीर्ण बारावी मध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, क्रिकेट क्रमांक, तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेल्या शाळांचा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला त्यामध्ये उच्च शैक्षणिक म्हणून डॉ. अनिता तुपे (पीएचडी), डॉ. विकास झुंजारराव (एचडी), डॉ. श्याम केदार (एचडी), डॉ. प्रज्ञा पवार (एमबीबीएस), ऋतुजा पवार (एमबीबीएस), कोरावळे जिल्हा परिषद शाळा शिष्यवृत्ती प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद शाळा मुरबाड शिष्यवृत्ती प्रथम क्रमांक, तसेच निखिल मुरबाडे इयत्ता दहावी (सीबीएस ) यांच्यासह जवळपास २६२ विविध प्रकारांच्या विद्यार्थ्यांना वरील मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
माजी आमदार पवार म्हणाले शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत त्याचबरोबर सध्याच्या घडीला चालू असलेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही, विदर्भात शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला तात्काळ वाचा फोडली जाते, परंतु कोकणातील शेतकरी रस्त्यावर उतरत नाही त्यामुळे आपली शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याची खंत माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त वेक्त केली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार,रामभाऊ दळवी,मधुकर मोहपे, जि.प.सदस्य प्राजक्ता भावारथे,संजय पवार,ह.भ.प चंद्रकांत महाराज धुमाळ, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, किसन गिरा, प्रा.धनाजी दळवी,जनसेवा संचालक पांडुरंग कोर,लोकमित्र रमेश शिंदेराव,जयराम देसले तसेच जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून माजी आमदार गोटीराम पवार यांना शुभेच्छा दिल्या.Add....
जाहिराती करिता संपर्क:
Email Id : indiyanyuj@gmail.com
Post a Comment
0 Comments