इस्टीमेनेट केलेल्या रस्त्याचे काम नकरताच कामाचे केले मुल्यांकन, ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा
मुरबाड | ठाणे: [ अरुण ठाकरे ]मुरबाड गृप ग्रामपंचायत बोरिवली कान्होल हद्दीतील जिल्हा परिषद शाळा ते बोरिवली अंगर्तत रस्त्याचे काम न करताच मुरबाड पंचायत समिती अभियंता यांनी मुल्यांकन केल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनात आल्याने तातडीने संबंधित कामा बाबत मुरबाड पंचायत समिती कनिष्ठ अभियंता यांच्या कडे ग्रामस्थ मोहन घरत यांनी लेखी तक्रार केली असून यावर काय कारवाही होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मुरबाड तालुक्यात ठेकेदार आणि अधिकारी संघणमताने काम नं करताचा बिले काढण्याचा जणूकाही सपाटाच लावला असून ग्रामीण भागातील विकास होणार कसा असा प्रश्न पडला असून या बोगस कामे करणाऱ्या ठेदारावर तसेच यांच्याशी हात मिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाही करून गुन्हा दाखल व्हावा अशी नागरिकांन मध्ये चर्चा होत असून मुरबाड तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कान्होल येथील बोरिवली गावातील जिल्हा परिषद शाळा ते बोरिवली अंगर्तत रस्त्याचे काम न करताच मुरबाड अभियंता यांनी मुल्यांकन केल्याचा प्रताप केला असून बोरिवली गावातील सुज्ञनागरिक मोहन घरत यांनी चौकशी करून मुरबाड पंचायत समिती कनिष्ठ अभियंता यांच्या कडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदाराचे बिल अदाकरूनये अशी लेखी तक्रार केली असून आत्ता या ठेदारावर तसेच मुल्यांकन करणाऱ्या अभियंत्यावर काय कारवाही होते कि पाठीशी घातले जाते याकडे लक्ष लागले आहे.
पंचायत समिती मुरबाड येथे दि.19 ज्यून 2025 रोजी मोहन घरत यांनी तक्रार केली असून संबंधित कामाची तत्काळ चौकशी करून ठेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व शासकिय नियमांचे उल्लंघन केलेल्या चे दिसुन येत असल्याने कोणत्याही प्रकारे बीळ अदा करू नये अन्यता लोकशाहीच्या मार्गाने न्याया करिता आपल्या पंचायत समिती कार्यालया समोर अमरण उपोषण करणार असल्याचे दै.नवनगर प्रतिनिधी बरोबर बोलतांना म्हणाले.
मुरबाड पंचायत समिती बांधकाम विभाग जेई सासे यांना संबंधित कामा बाबत विचारना केली असता रस्ता केला आहे मात्र तो दुसरी कडे केले असल्याचे सांगितले तर बांधकाम विभागाचे अभियांनता यांना विचारले असता रस्ता जर ज्या रस्त्याचे इस्टीमेट केले आहे त्या जगागेवर रस्ता केला नसल्यास ते चुकीचे असून जनसूविधेचा रस्ता असल्याने याचा अधिकरी ग्रामपंचायतीला असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकट ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट दिसत असून अर्जदारने केल्या अर्जावर काही कारवाही होते कि अजून भ्रष्टाचारला खतपाणी घातले जाते याकडे लक्ष लागले आहे
Add....
जाहिराती करिता संपर्क:
Email Id : indiyanyuj@gmail.com
जाहिराती करिता संपर्क:
Email Id : indiyanyuj@gmail.com
Post a Comment
0 Comments