Type Here to Get Search Results !

NEWS INDIA

NEWS INDIA

शिंदे गटाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी गद्दारांनचा घेतला खडसून समाचार

शिंदे गटाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी गद्दारांनचा घेतला खडसून समाचार

            मुरबाड:ठाणे [ अरुण ठाकरे ]

            मुरबाड नगरपंचायत मधील उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीवेळी ऐन मतदान प्रक्रिया सुरु असताना भाजपा नगरसेवकांनी केलेली बंडखोरी व घडलेले राजकीय नाट्य काही थांबण्याची चिन्हे दिसत नसून उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या नगरसेविका नम्रता नितीन तेलवणे यांचा पराभव झाल्याने मुरबाड शहरातील राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे.आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालुच असून काल  प्रभाग क्रमांक 14 चे शिंदे गटाचे नगरसेवक नितीन आण्णा तेलवणे व त्यांच्या पत्नी सौ.नम्रता नितीन तेलवणे यांनी पत्रकार परिषद घेत माजी नगराध्यक्ष राम दुधाळे व विद्यमान नगराध्यक्षासह भाजपा नगरसेवकांचा खरपुस समाचार घेतला.                                 शिंदे गटाचे नगरसेवक नितीन आण्णा तेलवणे व त्यांच्या पत्नी सौ.नम्रता नितीन तेलवणे यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी राम दुधाळे हा गद्दारच आहे त्याच्यासाठी दुसरा शब्दच नाही.आज पर्यंत तो प्रत्येकाशी गद्दारीच करत आला आहे.सुरुवातीला जुगल जाखोटिया यांच्याशी केली.त्यांनतर अर्जुन शेळके यांच्याशी गद्दारी केली व आता कथोरे साहेबांनी ऐनवेळी पक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 3 मधून निवडुन आणले व नगराध्यक्ष बनवले त्यांच्याशी सुद्धा याला एकनिष्ठ राहता आले नाही आणी यापुढेही तो सध्या  बरोबर असणार्या नगरसेवकांना फसवणार असल्याचा टोळा लगावला.                                                            सध्याची परिस्थिती पहाता शिंदे गटात जो येईल त्याला प्रवेश मिळत असून मुरबाड भाजप मधून बाहेर पडून वेगळा गट स्थापन केलेल्या या नगरसेवकांना शिंदे गटात प्रवेश मिळणार नाही त्यासाठी आमचा विरोध असून याबाबत लवकरच पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर आमदार कथोरे साहेबांनी निधी देताना कोणताही भेदभाव केला नसून आमच्या वार्डातही विकासकामे झाली आहेत.त्यामुळे त्यांनी आमदारांवर केलेला आरोप बिनबुडाचा आहे.असे असते तर शहरातील प्रत्येक वार्डात जी विकासकामे झाली आहेत ती झाली नसती असे नगरसेविका नम्रता तेलवणे यांनी ठणकावून सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रभाग क्रमांक 7 चे शिंदे गटाचे नगरसेवक अक्षय रोठे सुद्धा उपस्थित होते.                  आम्हाला सतत विरोधकांची भूमिका यांनी बजवण्यास भाग पाडले असून आम्ही मागे हटणार नाहीत प्रभागातील विकास कामे होतच राहतील असे स्पष्ट मत शिंदे गट नगरसेविका नम्रता नितीन तेलवणे यांनी वेक्त केले.


Add.....






जाहिराती करिता संपर्क: 
न्यूज इंडिया मुख्य संपादक अरुण ठाकरे Mob.No.7743897222

Email Id : indiyanyuj@gmail.com



Post a Comment

0 Comments