परम पूज्य गुरुवर्य श्री.हरिओम दास यांच्या हस्ते गुरुमणी धारणा करून गुरुपौर्णिमा केली साजरी
मुरबाड:ठाणे [अरुण ठाकरे]मुरबाड दि.10 तालुक्यातील कळंबखांडे गोरक्षनाथ मठ येथे परम पूज्य गुरुवर्य श्री.हरिओम दास यांच्या हस्ते गुरुमणी धारणा करून गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात साजरी केली.यावेळी महाराजांनंचे आशीर्वाद घेण्या करिता शेकडो नागरिक उपस्तित होते.
आयुष्याच्या वाटेवर प्रवास करत असताना प्रत्येक पावलावर कोणी तरी गुरू रूपात भेटतच असतो. लहान मोठा, स्त्री पुरुष मग ते कोणीही असो अवधानाने असो किंवा अनवधानाने,पण छोटासा का होईना कळत नकळत धडा शिकवून जातोच. काहीच्या लक्षात येते काहीना समजतही नाही अशा शिकवणीतूनच व्यक्ती घडत असतो.याच पार्शभूमीवर गुरुपौर्णिमा अवंचित्त साधतं गुरुवर्य परम पूज्य गोपीनाथ महाराज यांच्या कडुन आज विलास भावार्थे यांनी गुरुमनी घालून समाजात वेगळा आदर्श घालत हरिभक्तीचा जप करत आपल्या हातून चांगले कार्य,सेवा कशी घडेल असा गुरुमंत्र घेत आनंदी जीवन जगण्याचा मंत्र घेत गुरुपौर्णिमा खऱ्यार्थाने साध्य केली. कळंबखांडा गोरक्षनाथ मठ येथे परम पूज्य गुरुवर्य श्री.हरिओम दास यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करून एक चांगली पिढी घडवण्याचे काम करत असून महाराजांच्या भेटीकारिता तालुक्या सह परराज्यातून भक्त भेटीस येतात आज गुरुपौर्णि निमित्त शेकडो भाविकांनी परम पूज्य गुरुवर्य श्री.हरिओम दास यांची भेट घेत गुरुपौर्णिमा साजरी केली.
Add......
जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments