काळूधरण घरपट्ट्याचा घोटाळा उघड करत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांचा घेतला समाचार
मुरबाड 10 कोटी,बदलापूर 25 कोटी,शहापूरचा एकझीट आकडा माहित नाही तर भिवंडीला 50 कोटीची कामे चालू असल्याचे - माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली माहिती
मुरबाड|ठाणे:[ अरुण ठाकरे ]
मुरबाड कुणबी समाज हॉल येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मुरबाड कार्यालयात पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मुरबाड कार्यालयात पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी मुरबाड विधानसभा सभा क्षेत्रात चाललेली आत्ता पर्यंतची कामे ही मी मंजूर करून आणलेली कामे असून कल्याण मुरबाड माळशेज रस्ता मीच मंजूर केला असून कोणी कितीही वलगण्या करून काही फायदा नसल्याचा टोला आमदारांना लगावला यावेळी या लोकसभा क्षेत्रात नवीन प्रतिनिधिकडून काही झालेल नाही. विद्यमान खाजदार यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी एका वर्षात काय काम केले त्याची माहिती देणार होते माहिती तर बाजूलाच राहिली मी हे पत्र दिले मी ते पत्र दिले याच्या पलीकडे काहीच माहिती नसल्याचा टोला खाजदार बाल्यामामा(सुरेश) म्हात्रे यांना लगावला त्या उलट मी जेकाम घेईल ते पूर्णतःवास नेही पर्यंत स्वतः बसत नाही या लोकसंभे मध्ये निवडणुकी नंतरही बरेचसी कामे मंजूर केली असल्याचे म्हणाले.अजूनही सरकार भारतीय जनता पक्षाचे असल्या मुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने आपण विकासाचा निधी आणलेला आहे यापुढे ही अनेक खात्याच्या माध्यमातून विकासाचा निधी उपलब्ध करून देऊ,राहिला प्रश्न रेल्वेचा तर मुरबाड रेल्वे आलीच पाहिजे रेल्वे संदर्भात जेकोनी बोलतात आम्ही करू त्यांना रेल्वे संदर्भात माहिती तर असली पाहिजे मुरबाड च्या रेल्वे साठी माझा कायमचा प्रयत्न असून लवकरच दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्र्यांशी भेट घेऊन मुरबाड रेल्वे बाबत चर्चा करणार असल्याचे म्हणाले कल्याण मुरबाड माळशेज सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात ज्या शेतकऱ्याच्या जमीनी जात आहेत त्या शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि त्यांना मोबदला मिळाला पाहिजे या मताशी सहमत आहे. ठेकेदाराला जर कोणी पाठीशी घालत असेल तर ती दुर्दैवा ची बाबा आहे.बारवी ड्याम प्रकल्प ग्रस्त आदिवासी कुटुंबाचा बळी गेला असल्याचा प्रश्न माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांनी माझ्या कडे आणला होता बारवी ड्याम प्रकल्प ग्रस्थानां ज्या नोकऱ्या दिल्या त्याच्या मध्ये कायदा करताना एखादा वेक्ती नोकरीला लागल्या नंतर त्याचा मृत्यू झाल्यास नोकरी देण्याची तरतूद नाही त्यांना न्याय मिळण्या करिता एम आय डी सी, राज्य सरकार बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणाले.मुरबाड मधली काळू धरणा परिसरातील गावात जनरल लोक त्या गावात राहत नाही त्यांचा काही संभंध नाही अश्या लोकांच्या 146 घरपट्ट्या आहेत मुलं गावकऱ्याच्या लोकांची फक्त 54 घर आहेत राज्यशासनाच्या पैशांची अशी वाताहत असेल तर तो प्रश्न लावून धरला पाहिजे बोलत असताना काळू धरण घरपट्ट्याचा घोटाळा उघड केला.कामा संदर्भात विचारणा केली असता मुरबाडला 10 कोटी,बदलापूरळा 25 कोटी, शहापूरचा एकझीट आकडा माहित नाही तर भिवंडीला 50 कोटीची कामे चालू असल्याचे म्हणाले. स्थानिक स्वराज्या निवडणूक संदर्भात उमेदवारी बाबत भारतीय जनता पक्षाचे निर्णय पक्ष घेत असतो जिथे जिथे जे कोण योग्य मानस असतील त्यांनचा विचार भारतीय जनता पक्ष निश्चित करेल यात काही शंका नाही म्हणत पत्रकारासी सव्वाद साधला.
कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजन कुणबी समजा हॉल येथे भाजपा पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील,भाजपा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी,माजी जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहपे,रामभाऊ पातकर माजी नराध्यक्ष,महिला जी.अध्यक्ष शीतल तोंडलिकर,जुगल जाकोटीया,कल्याण ता.माजी अध्यक्ष चंदू बोष्टे,नगराध्यक्ष संतोष चौधरी,उप नगराध्यक्षा दीक्षिता वारे,गट नेते मोहन गडगे,प.स. माजी सभापती श्रीकांत धुमाळ,नगरसेविका स्नेहा चंबावणे,रविना राव,उर्मिला ठाकरे,शिल्पा देहरकर,राजन घोरपडे,निशा घोरपडे,वसंत भुंडेरे,दीपक खाटेघरे,जयवंत सूर्यराव,महेंद्र पवार,नारायण गोंधळी,विजय सुरोशे,विकास घरत सह हजारो कार्यकर्त्यांन बरोबर मोठया संख्येने तालुक्यातील नागरिकांच्या उपस्तित स्नेहभोजन मेळावा संपन्न झाला.जाहिराती करिता संपर्क:
जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments