बस च्या धडकेने दुचाकी स्वाराचा हेल्मेट फुटून डोक्याला जबर मार
मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: एस टी आगारात काही दिवसा पूर्वी नवीन बसाचे लोकार्पण झाले असले तरी ग्रामीण भागातील प्रवाश्यांच्या वाट्याला मोडगलीस, भंगार बस आणि त्यात रस्त्यात खड्डे असल्याने या मार्गात प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांन सह एस टी मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.आज दि.30 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मुरबाड वरून शिवळे मार्गे तुळई कडे येणाऱ्या भरधाव येणाऱ्या एसटी चालकाचा नियंत्रण सुटल्याने दुचाकी चालकाला उडवल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारा करिता कल्याण येथे हळविण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बाळा चौधरी यांनी सांगितले.
मुरबाड वरून तुलई कळंभे मार्गे निघालेली बस विढेगावा जवळ एम.एच.06 एस8509 नंबर भरधाव बसच्या धडकीने मुरबाड मिंडा साई कंपनी मध्ये कामाला जात असतांना दुचाकी स्वार तुषार गजानन चौधरी गंभीर जखमी झाला असून हेल्मेट घातला असल्याने बचावला असुन अपघात पाहता बस च्या धडकीने हेल्मेट तुटून थोंडाला मार,पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारा करिता कल्याण येथे हळविण्यात आले. घटना स्थळी मुरबाड पोलीस स्टेशनं चे पो हवा. ननावरे यांनी येऊन स्पॉट पंचनामा केला.मुरबाड आगार प्रमुख मुसळे यांनी अपघाता ठिकाणी जागेची जागेची पाहणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रवश्यानी मुरबाड तुळई, कळंभे या बस वेळेवर सोडून भंगार बस बंद करून चांगल्या बस डन्यात यावी तसेच वाहन चालकांना आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवण्याची मागणी ठाणे जिल्हा सचिव (ऊ. बा. ठा. शिवसेना)बाळा चौधरी,यांनी सांगितले अँड. सचिन चौधरी, अँड. रवींद्र चौधरी यांनी मागणी केली.अपघात ग्रस्त तुषार चौधरी यांस पोलीस पाटील शिवाजी चौधरी, किरण भाऊ चौधरी यांनी उपचारा करिता तात्काळ घेऊन गेले.
मुरबाड आगारात पाच बस चे लोकार्पण झाले असले तरी त्याचा फायदा ग्रामीण भागातील प्रवाश्याना होत नसल्याने प्रवासी अक्षरक्षहा वैतागले असून ग्रामीण भागात मोडकलीस आलेल्या बस चा प्रवास आणि त्यात एक मागून एक अपघात प्रवासी व वाहनचालकांच्या वाट्याला येत असून अनेक प्रवाश्यान सह वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर कित्येक प्रवासी गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र यावर प्रश्यासना अंतर्गत कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने भविष्यात प्रवाश्याना रस्ता रोको शिवाय पर्याय उरला नसल्याचे नागरिकांत चर्चा होत असून करोडो रुपय आमदार,खाजदार,मंत्री यांच्या वेतणावर तसेच पेन्शन आणि त्यांच्या गरजापूरविन्या करिता खर्च करत असून सामान्य जनतेच्या गरजा पूर्वीन्या करिता अपयशी ठरत असल्याने नागरिक संताप वेक्त करत आहेत
जाहिराती करिता संपर्क:
जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments